३. चैत्र शुध्द //९// नवमी (राम नवमी)
मंदीर संस्थान कडुन तुळजापूर येथील राममंदीर(घुमट) येथे दुपारी १२.०० चे सुमारास राम जन्मानिमीत्त रामजन्मोयत्सव पुजारी यांचेकडून मदीर व्यवस्थापक यांना निमंत्रण येते. मंदीर संस्थानाकडून रामजन्मपुजेस पुजा साहित्य, गुलाल, खडीसाखर, रामफळ, उदबत्तीस, कापूर,साखरेचा हार,नारळ घेवून मंदीर संस्थानचे व्यवस्थापक शिपाई, पट्टेवाले, सहकारी यांचेसह रामजन्म उत्सवास हजर राहतात. या रामजन्म उत्सवास मंदीर संस्थानाकडून १००१/- रु. उत्सवास देण्यात येतात रामजन्म उत्सव अटोपून रामजन्म उत्सवाचे पुजारी मंदीर संस्थानाच्या प्रतिनीधीना रामजन्मोत्वाचा प्रसाद देवून इच्छेप्रमाणे पाहुणचार करुन पाठवितात. याप्रमाणे रामजन्म उत्सव पुर्वपार प्रथेप्रमाणे करण्यात येतो.