श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.
देवस्थानचे उपक्रम
आराधावाडी वाहनतळ
सौर उर्जा प्रकल्प
शॉपिंग सेंटर
घाटशिळ मंदिर बगीचा
श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर
श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर
वार्षिक उत्सव
शारदीय नवरात्र उत्सव
शाकंभरी नवरात्र उत्सव
अश्विनी पोर्णिमा
चैत्री पोर्णिमा
दिनदर्शिका
आज दिनांक :
श्री तुळजाभवानी दैनंदिन पूजा कार्यक्रम
श्री तुळजाभवानी देविजीची रोजची पूजा कार्यक्रम
महाराष्ट्र राज्यातील साडे तीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी हे एक मुख्य पीठ आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुका येथे हे देवस्थान स्थित आहे.
१. ओटी भरण
सहज दर्शनाचे वेळी किंवा इच्छा झाल्यास भक्त श्रीची पाध्य पूजा करून ओटी भरण भरतात. हि पूजा मंदिर उघडल्यापासून बंद होईपर्यत कोणत्याही वेळेत करता येते.
२. अभिषेक पूजा
श्री देविजींना सकाळी ०६.०० ते १०.०० व सायंकाळी ०७. ते ०९.०० या वेळेत अभिषेक पूजा घालण्यात येतात. सध्या अभिषेक पूजेचे सुरवातीस छत्रपती संस्थान कोल्हापूर यांच्याकडून आलेल्या दुधाची गुंडी (कळशी) श्री देविजीच्या मूर्तीवर ओतली जाते. बाकी इतर सर्व अभिषेक पूजा व सिंहासन पूजा या श्री देविजीच्या मूर्तीसमोर चांदीच्या पादुका ठेऊन केले जातात.
३. सिंहासन महापूजा
सिंहासन महापूजा हि दही, दुध, श्रीखंड, आंब्याचा रस, उसाचा रस यापैकी ज्याचे त्याचे इच्छेप्रमाणे एका प्रकारात केली जाते. सिंहासन पूजेसाठी ७० लिटर साहित्याचा वापर केला जातो. सिंहासन पूजा हि बुकिंग पद्धतीने करण्यात येत असून दररोज सकाळीचे पूजेचे वेळी ०५ व सायंकाळचे पूजेचे वेळी ०२ सिंहासन पूजा करण्यात येतात.
४. गोंधळ पूजा
मुख्य मंदिराचे बाहेरील बाजूस असणारे पोलीस गार्ड समोरील पारावर हि पूजा केली जाते. गोंधळी श्री देविजींची पारंपारिक स्तवने संभळच्या निनादात म्हणतात व हि पूजा केली जाते. हि पूजा मुख्यत्वे नवविवाहित भाविकांकडून केली जाते. गोंधळ पूजा हि पूजा कुलाचाराचा एक प्रकार आहे.
५. कुंकवाचा सडा
भाविक सौभाग्यवाती स्त्री आपले सौभाग्य अबाधित ठेवण्यासाठी व घरी धन, धान्य विपुल प्रमाणात राहावे या प्रार्थनेसह हळदी कुंकू मिश्रित पाण्याचा सडा होमकुंडाचे भोवती टाकते यास कुंकवाचा सडा हा विधी म्हणतात.
६. दंडवत
आपल्या घरापासून किंवा श्री क्षेत्री असलेल्या निवासापासून अथवा मंदिराचे होमकुंडापासून कल्लोळ व गोमुख तीर्थात स्नान करून ओल्या पडद्याने भाविक साष्टांग दंडवटाद्वारे मंदिरास प्रदक्षिणा मारतात या विधीस दंडवत विधी म्हणतात. नवसपुर्तीनंतर भाविकांकडून हा विधी केला जातो.
७. जावळ काढणे
आपल्या मुलाचे, मुलीचे प्रथम केस कर्तन कुलदेवतेच्या दरबारात करण्याच्या इच्छेनुसार किंवा नवसपूर्ती नंतर बरेच भाविक मंदिरात असणारे गोंधळी पाराचे खालील बाजूस हा विधी करतात.
८. माळ, परडी, पोत
श्री तुळजाभवानी देवीची आराधना करण्यासाठी हि देवी ज्यांची कुलदैवता आहे असे भाविक या ठिकाणी येऊन कवड्यांची माळ व परडी श्री देविजींच्या चरणास लाऊन घेतात व मंदिरात पोत पाजळून नैवद्य वगैरे दाखून सदर माळ, परडी व पोत आपल्या गावी घेऊन जातात. व देवघरात ठेऊन त्यांची नित्य पूजा करतात. विशेषतः मंगळवार व पोर्णिमेदिवशी शेजारी असणारे पाच घरात जाऊन श्री देविजींच्या नावाने जोगवा मागतात. पूर्वापार प्रथेनुसार हि पूजा एक कुलाचाराचाच प्रकार आहे.
९. पानाचे घर, फुलाचे घर
असे अनेक भाविक आपल्या स्वतःच्या घरासाठी श्री देविजींना पानाचे घर अथवा फुलाचे घर वाहीन असा नवस करतात. नवसपूर्ती झाल्यानंतर हि पूजा करण्यासाठी श्री क्षेत्र तुळजापूर येथे येतात व हि पूजा बांधतात. सदरची पूजा हि संध्याकाळचे अभिषेक पूजा संपल्यानंतर आरती व धुपारती नंतर बांधली जाते ती दुसऱ्या दिवशी चरणतीर्थापर्यंत ठेवली जाते.
१०. लग्न व मुंज
श्रीक्षेत्री श्रीच्या सानिध्यात श्रीच्या साक्षीने सर्व सिध्दीयुक्त संस्कार व कुलदैवत आशीर्वाद प्राप्तीसाठी श्रीक्षेत्री लग्न व मुंज कार्य केले जाते. एखाद्या अडचणीच्या वेळी या ठिकाणी विवाह करण्यास वेळ, काळ, मुहूर्त, नक्षत्र हे पाहण्याची गरज नाही.
११. भदे
निवासस्थानापासून एक मोठा कणकेचा गोळा दिवा व त्यांमध्ये वात लावून तो दिवा एका छोट्या ताटात ठेवून त्याची विधिवत पूजा करून दीप प्रज्वलित करून सदर ताट डोक्य्यावर ठेवून भाविक मंदिरात येतात व संपूर्ण मंदिरास प्रदक्षिणा मारतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर सदरचा दिवा होमाचे मागे विसर्जीत करतात. हा पूजा विधी संकल्पसिद्धीसाठी केला जातो. एखादा संकल्प पूर्ण होणार का याचे शंका निरसन असे आहे कि, सदरचा दिवा संपूर्ण प्रदिक्षिणा पूर्ण होईपर्यंत प्रज्वलित राहीला तर संकल्प पूर्ण होणार अशी भाविकांची श्रद्धा आहे.
१२. लिंब नेसणे
आपल्या घरापासून किंवा श्री क्षेत्री असलेल्या निवासापासून अथवा मंदिराचे होमकुंडापासून कल्लोळ व गोमुख तीर्थात स्नान करून ओल्या पडद्याने भाविक साष्टांग दंडवटाद्वारे मंदिरास प्रदक्षिणा मारतात या विधीस दंडवत विधी म्हणतात. नवसपुर्तीनंतर भाविकांकडून हा विधी केला जातो.
१३. नैवद्य
याठिकाणी श्री देविजींस भाविकाकडून पुरणपोळी, दहीभाताचे नैवद्य दाखविले जातात. श्रीदेविजीच्या पायाखाली असलेल्या महिषासुर या दैत्यास मांसाहारी नैवद्य दाखविला जातो. सकाळी चरणतीर्थाचे वेळी भाजी भाकरी व खीर (पायास) यांचा नैवद्य दाखविला जातो. सकाळीचे व सायंकाळीचे अभिषेक संपल्यानंतर आरती व धुपारती वेळी ज्या भोपे पुजा-याची पाळी आहे त्याच्या घराचा साखर भाताचा व हैद्राबाद संस्थानचा दोन भाज्या, साधी पोळी, वरण, भाताचा नैवद्य श्रीदेविजींना दाखविला जातो. प्रक्षाळ पूजेचे वेळी महंत वाकोजी बुवा मठाकडून व हमरोजी बुवा मठाकडून नैवद्य दाखविला जातो.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर धार्मिक विधींचे शुल्क पाहण्याकरिता .येथे क्लिक करा.