श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विकासात्मक कामे
श्रीक्षेत्र तुळजापूर विकास प्राधिकरणातर्गत मंदिरासाठी खालील प्रमाणे एकूण १० कामे चालू असून त्यांची सद्यस्थिती खालील प्रमाणे आहे.
-
१. मंदिर परिसर व घाटशिळ परिसरातील सौर उर्जा प्रकल्प राबविणे : या कामासाठी रुपये २६४.०० लाक्षाची प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. हे काम मेढा पूर्ण यांचेकडून पूर्ण करून घेण्यात आलेले असून या कामासाठी एकूण रुपये २०४.६१ लक्ष खर्च झालेला आहे. भारनियमांनाच्या काळात तसेच इतर वेळीही मंदिर व घाटशिळ परिसरात वीज पुरवठा सतत अखंडित ठेवणेस मदत होत आहे.
-
२. आराधावाडी येथे वाहनतळ बांधणे भाग १ व भाग २ :- या कामासाठी रुपये ७३९.५७ लक्ष इतकी असून सद्यस्थितीत हे काम पूर्ण झालेले आहे व या कामासाठी आजपावेतो रुपये ६४८.८९ लक्ष खर्च करण्यात आलेला आहे. सोलापूर येथून तसेच धाराशिव बायपासहून येणारे भाविकांची वाहने पार्किंग करण्याची सोय उपलव्ध करून देण्यांत आली आहे.
-
३. घाटशिळ मंदिर जवळ १०८ खोल्यांचे भक्त निवास बांधकाम करणे :- या कामासाठी प्रशासकीय मान्यता रुपये १३८१ लक्ष असून इमारत बांधकाम पूर्णत्वास आलेले असून फर्निचरचे काम पूर्णत्वास येत आहे. शारदीय नवरात्रापुर्वी हि इमारत भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
-
४. मंदिरशेजारी शॉपिंग सेंटर व भक्त निवास बांधणे :-या कामासाठी प्रशासकीय मान्यता रुपये ६५१.३५ लक्ष इतकी असून इमारतीचे काम पूर्णत्वास आलेले असून फर्निचरचे काम पूर्णत्वास येत आहे. शारदीय नवरात्रापुर्वी हि इमारत भाविकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
-
५. पापनाश तलावाची खोली वाढवणे व सुशोभिकरण करणे :-या कामासाठी प्रशासकीय मान्यता रुपये ३२५.०० लक्षची असून काम प्रगतीपथावर आहे. या कामावर आजपावेतो रुपये २२७.०३ लक्ष इतका खर्च करण्यात आलेला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांना बोटिंगची सोय उपलब्ध होणार असून अत्यंत निसर्गरम्य वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे.
-
२. आराधावाडी येथे वाहनतळ बांधणे भाग १ व भाग २ :- या कामासाठी रुपये ७३९.५७ लक्ष इतकी असून सद्यस्थितीत हे काम पूर्ण झालेले आहे व या कामासाठी आजपावेतो रुपये ६४८.८९ लक्ष खर्च करण्यात आलेला आहे. सोलापूर येथून तसेच धाराशिव बायपासहून येणारे भाविकांची वाहने पार्किंग करण्याची सोय उपलव्ध करून देण्यांत आली आहे.
-
६. घाटशिळ मंदिरामध्ये बगीचा विकसित करणे :-या कामासाठी प्रशासकीय मान्यता रुपये १५२.८२ लक्ष इतकी असून हे काम पूर्ण झालेले आहे. या कामासाठी आजपावेतो रुपये ७६.७८ लक्ष इतका खर्च करण्यात आलेला आहे. घाटशिळ मंदिर परिसर बगीचा मुळे आणखीच खुलून दिसत असून भाविक या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत.
-
७. नगर परिषद पार्किंग ते दर्शन मंडप इमारत पर्यत पाय-यांचे बांधकाम करणे :-या कामासाठी रुपये १२५.०० लक्षची प्रशासकीय मान्यता असून सध्या हे काम पूर्ण झालेले आहे. या कामावर आजपावेतो रुपये २३०.६५ इतका खर्च करण्यात आलेला आहे. सदर पाय-यांचे बांधकामामुळे वाहनताळावरून सरळ दर्शन मंडपापर्यत येण्याची सोय भाविकांना झालेली आहे.
-
८. दर्शन मंडप बांधकाम करणे :-या कामासाठी प्रशासकीय मान्यता रुपये १४५२.०० लक्ष इतकी असून दर्शन मंडपचे काम पूर्ण झालेले आहे. दर्शन मंडप इमारतीचे बांधकामामुळे भाविकांना दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहण्याची सोय झाली असून सदर इमारतीत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करवून देण्यात आलेल्या आहेत.
-
९. कल्लोळ तीर्थाचे नूतनीकरण करणे :-या कामासाठी प्रशासकीय मान्यता रुपये १४.२९ लक्ष इतकि असून सदरचे काम पूर्णत्वास झालेले आहे. या कामासाठी आजपावेतो रुपये ०८.१७ लक्ष खर्च करण्यात आलेला आहे. सदरील काम पुरातत्वे विभागाकडून करवून घेण्यात आलेले आहे. या कामात कल्लोळ तीर्थातील पाय-या रुंद करण्यात आलेल्या असून यामुळे भाविक घसरून पडण्याचा धोका कमी झालेला आहे.
-
१०. धार्मिक ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय अद्यावत करणे :-
या कामासाठी प्रशासकीय मान्यता रुपये ४१.५४ लक्ष इतकी असून इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. या कामासाठी आजपावेतो रुपये ३७.६३ लक्ष इतका खर्च करण्यात आलेला आहे. या ठिकाणी भाविकांसाठी विविध धार्मिक ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.