श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिअरींग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमा







श्री तुळजाभवानी मंदिराकडे कसे यावे

श्री तुळजाभवानी मंदिराकडे कसे पोहचायचे

    महाराष्ट्र राज्यातील साडे तीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी हे एक मुख्य पीठ आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुका येथे हे देवस्थान स्थित आहे. तुळजापूर देवस्थान सोलापूर पासून ४५ किमी, धाराशिव पासून २२ किमी, लातूर पासून ७७ किमी व नळदुर्ग पासून ३२ किमी आहे. सोलापूर व धाराशिव येथे रेल्वे स्टेशन आहे. तसेच लातूर, सोलापूर, धाराशिव व नळदुर्ग येथून तुळजापूरला एस टी बसची सुविधा आहे. श्री देविजींचे मंदिर बस स्थानकापासून पश्चिम बाजूस ५०० मीटर च्या अंतरावर आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहू शकता.
  • बस सेवा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

    १) तुळजापूर - धाराशिव (दर अर्ध्या तासाला)
    २) तुळजापूर - सोलापूर (दर अर्ध्या तासाला)
    ३) तुळजापूर - बार्शी (दर अर्ध्या तासाला)
    ४) तुळजापूर - लातूर (दर अर्ध्या तासाला)

  • भारतीय रेल्वे सेवा

    तुळजापूर धाराशिव जिल्ह्यात असून धाराशिव व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.

  • खाजगी वाहतूक सेवा

    तुळजापुर कडे येण्यासाठी सर्व प्रकारचे खाजगी वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे

  • विमान वाहतूक सेवा

    तुळजापूर जवळचे विमानतळ
    १) सोलापूर विमानतळ - ५२ कि.मी. - सोलापूर ते मुंबई
    २) लातूर विमानतळ - ८० कि.मी. - लातूर ते मुंबई
    ३) नांदेड विमानतळ - २१२ कि.मी. - नांदेड ते मुंबई, नागपूर, दिल्ली
    ४) औरंगाबाद विमानतळ - २६९ कि.मी - औरंगाबाद ते मुंबई, दिल्ली

  • तुळजापूर पासून अंतर?

    मुंबईपासून अंतर :४४२ कि.मी.
    सोलापूर पासून सुमारे ४५कि.मी.अंतरावर

  • श्री तुळजाभवानी मंदिर परिसर माहिती

    काळभैरव:- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.
    आदिमाया व आदिशक्ति:--देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे.
    घाटशीळ:- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आंत देविच्या पादूका आहेत.घाट्शीळवर उभारून देविने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला.तेव्हा रामाने देविला ओळखले व तो म्हणाला’तु का आई’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदीर संस्थानने बांधलेली बाग आहे.
    पापनाश तीर्थ:- हे एक तीर्थ असून पापनाशिनी: असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.देऊळ जुने पण मजबूत आहे.
    धाकटे तुळजापूर:-येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव करते.

  • श्री तुळजाभवानी मंदिर माहिती पत्रीका

    मंदिराचे व्यवस्थापन श्री तुळजापूर मंदिर संस्थान यांचे कडे आहे. संस्थानची नोंदणी मुंबई सार्वजनिक कायदा, १९५०, अन्वये विश्वस्त संस्था म्हणून १९६२ साली झाली. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली पदसिद्ध विश्वस्त समिती असून त्यामध्ये विश्वस्त सदस्य म्हणून मा. उप-विभागीय अधिकारी, धाराशिव,मा. आमदार, तुळजापूर,मा. नगराध्यक्ष, तुळजापूर आणि तहसीलदार, तुळजापूर यांचा समावेश आहे.

संस्थानच्या विविध सेवा