४. माहे वैशाख शुध्द //३// तृतीया (अक्षय तृतीया )
हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक दिवस व पितृ पुजनाचा दिवस असल्याने श्रीस अभिषेक पुजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात दिवसभराचे कार्यक्रम करण्यात येतात.अश्विन शुध्द व्दितीया व तृतीया या दिवशी ठरलेल्या वेळे प्रमाणे चरण तिर्थ पुजा, अभिषेक पुजा, नेहमीप्रमाणे करण्यातत येईल दररोजच्याक पुजा घटाचीमाळ, महंत सेवाधारी पुजारी ज्यां ची पाळी असेल त्या प्रमाणे घआची माळ घालुन पुजा करणेकार्यक्रम करतील. संध्या काळी नेहमीप्रमाणे छबीना काढण्या्त येईल. यांचे वाहन वेगळे असेल . एवढाच बदल या दोन्ही दिवसात करण्यात येतो. व्दितीया ते अष्टमी या काळात स्थानिक व बाहेर गावातील भक्तगण श्रीस व श्रीच्या घटास इतर परिवार देवता यांना कडकणे बांधणे करीता देतात/ बांधतात. बाकी कार्यक्रम नेहमी प्रमाणे आहे . वेळेवर होण्याकरीता सर्वानी तसदी घ्यावी लागते. व संध्याकाळी छबीना काढण्यात येतो.