श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापुर यांचे अधिकृत संकेत स्थळ.

देवस्थानचे उपक्रम

आराधावाडी वाहनतळ

सौर उर्जा प्रकल्प

शॉपिंग सेंटर

घाटशिळ मंदिर बगीचा

श्री तुळजाभवानी इंजिनिरिंग कॉलेज तुळजापुर

श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर
https://sainikividyalayatuljapur

वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र उत्सव

शाकंभरी नवरात्र उत्सव

अश्विनी पोर्णिमा

चैत्री पोर्णिमा

Visit Shri Tuljabhavani Temple Trust's College of Engineering.
http://www.stbcet.org.in








  • slidebg1
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg
  • darkblurbg

श्री तुळजाभवानी वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्र महोत्सव

शारदीय नवरात्र महोत्सव हा श्री देविजीच्या साज-या होणा-या यात्रा उत्सवापैकी महत्वाचा उत्सव आहे.

शाकंभरी नवरात्र

पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव साजरा केला जातो.

शेषशाही अलंकार पूजा

पौर्णिमेस देवीला महापूजा बांधण्यात येते.

विजयादशमी दसरा

दसरा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त

मंदिर कार्यक्रम व घडामोडी

शारदीय नवरात्र

तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. अश्विन प्रतिपदे पासून (सप्टेंबर-ऑक्टोबर) या शारदीय उत्सवास सुरुवात होते. त्यामागील पौराणिक कथेनुसार महिषासुर दैत्याबरोबर नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमल्याने देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. नवरात्र संपताच दहाव्या दिवशी विजयादशमीला भारतीय संस्कृतीतला मोठा सण दसरा असतो.

शाकंभरी नवरात्र

प्रत्येक वर्षी पौष महिन्यात ( डिसेंबर / जानेवारी महिन्यात ) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्राप्रमाणेच याही उत्सवाला भाविकांची गर्दी असते. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते. शारदीय नवरात्राच्या सोहळ्याचे वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही, असे भाविक शाकंभरी नवरात्राच्या सोहळ्यास सहभागी होण्याकरिता व देवीच्या दर्शनाकरिता आवर्जून तुळजापूरला येतात.

विजयादशमी दसरा

उषःकाली देवीचे सीमोल्लंघन केले जाते.या दिवशी बर्हाणपूर येथून पालखी व भिंगार येथूनपलंग यांचे आगमन होते.तसेच पालखीतून मिरवणूक पार पडून देवी पलंगावर विश्रांती(श्रमनिद्रा) घेते.दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तकं प्रकाशीत केली जातात.

   
   
Website Visitors : Shri Tuljabhavani Mandir Sansthan